Tiranga Times

Banner Image

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्यकुमारची अग्निपरीक्षा, जर तसं झालं नाही तर…

तर सूर्यकुमार यादवच्या करिअरसाठी निर्णायक वळण ठरू शकते.
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: January 20, 2026

Tiranga Times Maharastra

 

टी20 वर्ल्डकप 2026 पूर्वी टीम इंडियासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कसोटी आणि वनडे मालिकेत भारतालाच मात देणाऱ्या न्यूझीलंडने पुन्हा एकदा तगडं आव्हान उभं केलं आहे. आता पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतही किवी संघ भारताला घरच्या मैदानावर धक्का देण्याच्या तयारीत आहे.

या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी ही मालिका खरी अग्निपरीक्षा ठरणार आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचा बॅटिंग फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे.

सूर्यकुमार यादव हा टी20 क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक मानला जातो. मैदानाच्या चौफेर फटके मारण्याची त्याची खासियत आहे. मात्र गेल्या वर्षभरात त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. तब्बल १५ महिन्यांपूर्वी त्याने शेवटचं अर्धशतक झळकावलं होतं, त्यानंतर सातत्याने अपयशाचाच सामना करावा लागला आहे.

कर्णधारपदामुळे सध्या त्याला संघात संधी मिळत असली, तरी तो कर्णधार नसता तर त्याला केव्हाच प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवलं गेलं असतं, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.

काय आहे खरी चिंता?

स्ट्राईक रोटेशनमध्ये अडचण

मोठी खेळी न साकारण्याचं दडपण

वेगवान गोलंदाजांविरुद्ध सातत्याने अपयश

मधल्या षटकांमध्ये विकेट गमावण्याची सवय

जर या मालिकेतही फॉर्म सापडला नाही तर…?

जर न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्यकुमार यादव अपयशी ठरला, तर टी20 वर्ल्डकप 2026 साठी त्याच्या स्थानावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. युवा खेळाडूंची वाढती स्पर्धा पाहता निवड समिती कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रिंकू सिंगसारखे फलंदाज सातत्याने प्रभाव पाडत असताना सूर्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्यामुळे ही मालिका केवळ विजयासाठीच नाही, 

Breaking News:

Recent News: